
Tesla Car Price in India: भारतात टेस्ला कारच्या आगमनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अनेक फीचर्समुळे टेस्ला कार जगभरातील कार प्रेमींच्या हृदयावर राज्य करत आहे. त्यामुळे आता तो दिवस लांब नाही जेव्हा टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारताच्या रस्त्यावर धावताना दिसतील.
यासाठी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क एप्रिल महिन्यापर्यंत भारतात त्यांचे रिटेल ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करत आहेत. टेस्ला सुरुवातीला बर्लिन प्लांटमधून इलेक्ट्रिक कार आयात करण्याचा विचार करत आहे.