IPO Open : ‘ली ट्रॅव्हेन्यूज’चा आयपीओ दहा जूनपासून खुला होणार

पर्यटनविषयक सेवा देणारे संकेतस्थळ ‘इक्सिगो’ची प्रवर्तक कंपनी ली ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी लि. येत्या दहा जून रोजी आपली प्राथमिक शेअर विक्री योजना (आयपीओ) दाखल करणार आहे.
IPO Open
IPO Opensakal

पुणे : पर्यटनविषयक सेवा देणारे संकेतस्थळ ‘इक्सिगो’ची प्रवर्तक कंपनी ली ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी लि. येत्या दहा जून रोजी आपली प्राथमिक शेअर विक्री योजना (आयपीओ) दाखल करणार आहे.

या ‘आयपीओ’मध्ये एक रुपये दर्शनी मूल्याचे १२० कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर आणि ‘ऑफर फॉर सेल’ अंतर्गत सहा कोटी ६६ लाख ७७ हजार ६७४ शेअर उपलब्ध करण्यात येणार आहेत. बडे गुंतवणूकदार शुक्रवारी (ता. ७) बोली लावतील, तर छोट्या गुंतवणूकदारांना १० जूनपासून १२ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल.

IPO Open
Bajaj Housing IPO : ‘बजाज हाउसिंग’ आणणार आयपीओ;चार हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

प्रति शेअरसाठी ८८ रुपये ते ९३ रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किमान १६१ शेअरसाठी बोली लावावी लागणार असून, त्यानंतर १६१ शेअरच्या पटीत बोली लावता येईल. ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’वर या शेअरची नोंदणी केली जाणार आहे. अॅक्सिस कॅपिटल लि., डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लि. आणि जेएम फायनान्शिअल लि. हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com