एका महिन्यात 22% वाढला हा पेनी स्टॉक, आता दुबईत रिअल इस्टेट डेव्हलेपमेंटबाबत मोठा करार

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
This penny stock has gained 22 percent in a month now a big deal in real estate development in Dubai
This penny stock has gained 22 percent in a month now a big deal in real estate development in DubaiSAkal

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यात बऱ्याच पेनी स्टॉक्सचाही समावेश आहे. असाच एक स्टॉक शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेडचाही (Sharanam Infraproject and Trading Ltd) आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा शेअरमध्ये वाढ दिसून येत आहे. 30 एप्रिल 2024 रोजी, स्टॉकमध्ये 4% टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आणि स्टॉक 0.94 रुपयांच्या किंमतीवर बंद झाला. यासह, गेल्या पाच दिवसांत स्टॉकमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. स्टॉकने एका महिन्यात 22 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1.36 रुपये आणि 52 नीचांक 0.62 रुपये आहे.

आता शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेडने एक महत्त्वाचा करार केला आहे. कंपनीने ब्लूम इन्फ्रा एलएलसी सोबत 30 बिलियन दिरहमची रणनीतिक पार्टनरशिपची घोषणा केली आहे.

व्यवसाय विस्ताराच्या दिशेने एक पाऊल टाकत, शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेडने अबू धाबीस्थित ब्लूम इन्फ्रा एलएलसीसोबत भागीदारीची अधिकृत घोषणा केली आहे. शरणमने युएईमधील झपाट्याने वाढणारा प्रदेश, खलिफा सिटी बीमध्ये (शखबाउट सिटी) फ्लॅगशिप रिअल इस्टेट विकासासाठी इन्फ्राप्रोजेक्टची स्थापना केली आहे.

शरणम इंफ्राप्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी राखून ठेवलेल्या 200 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या व्यवसायावर देखरेख करेल. गुंतलेल्या प्रकल्पांचे मूल्य 30 अब्ज दिरहम (अंदाजे 68,161,01,73,300 रुपये) आहे, जी एक मोठी आर्थिक घडामोड आणि सीमापार रिअल इस्टेट गुंतवणुकीत लक्षणीय वाढ दर्शवते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com