Stock Investment : 'हा' शेअर दुप्पट करेल तुमची गुंतवणूक, कोणता आहे 'हा' शेअर ?

Exide Industries Stock analysis : एक्साइड शेअर्स एका वर्षात 1000 रुपयांची पातळी गाठू शकतात. सध्या बीएसईवर त्याची किंमत 0.25 टक्क्यांच्या कमजोरीसह 564.55 रुपये आहे.
Exide Industries Stock analysis
this share will double your investment which is this shareSakal
Updated on

बॅटरी उत्पादक कंपनी एक्साइड इंडस्ट्रीजच्या (Exide Industries) शेअर्समध्ये सध्या विक्रीचा दबाव आहे. पण, शेअर्सच्या घसरणीकडे गुंतवणुकीची संधी म्हणून पाहिले पाहिजे असे बाजारातील एक्सपर्टचे म्हणणे आहे.

एक्साइड शेअर्स एका वर्षात 1000 रुपयांची पातळी गाठू शकतात. सध्या बीएसईवर त्याची किंमत 0.25 टक्क्यांच्या कमजोरीसह 564.55 रुपये आहे. एक्साइड शेअर्स या वर्षी 78 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे एक्साइडचे शेअर्स वाढत आहेत.

बराच काळ हा स्टॉक 250-300 रुपयांच्या दरम्यान राहिल्याचे टेक्निकल एनालिस्ट राजेश सातपुते यांनी सांगितले. आता जेव्हा ही रेंज तोडली गेली तेव्हा तो लगेच दुप्पट झाला. या वर्षी 1 एप्रिलला तो 305 रुपयांच्या पातळीवर होता आणि त्यानंतर त्याने या पातळीवरून वाढ नोंदवत 25 जूनला 620 रुपयांचा उच्चांक गाठला, म्हणजेच त्याने 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.

Exide Industries Stock analysis
Emcure Pharmaceuticals IPO : एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या 3 जुलैच्या आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित

ज्याप्रकारे त्याने शॉर्ट टर्ममध्ये त्याची किंमत दुप्पट केली, त्यामुळे यात कंसोलिडेशनचे संकेत दिसायला लागले आहेत. यात प्रॉफीट बुकींग दिसू शकते पण किंमत बदलण्याचे काही संकेत दिसत नाहीत.

एक्साईडचे शेअर्स 500 रुपयांच्या खाली आले तर त्याचे हे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये वाढवले पाहिजे पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. एक्साईड शेअर्स गेल्या वर्षी 232.25 रुपयांवर होते. त्याच्या शेअर्ससाठी हा एक वर्षाचा नीचांक आहे. या निचांकावरून, तो एका वर्षात सुमारे 167 टक्क्यांनी वाढ घेत 25 जून 2024 रोजी 620 रुपयांवर पोहोचला. त्याच्या शेअर्ससाठी हा विक्रमी उच्चांक आहे.

Exide Industries Stock analysis
Bansal Wire Industries IPO : बन्सल वायर इंडस्ट्रीजचा आयपीओ आजपासून खुला होणार, 745 कोटी उभारण्याचा मानस...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.