
आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढत आहेत. गुंतवणूकदार मोठ्या खरेदीपासून दूर राहिल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमती किंचित घसरल्या आहेत. अमेरिकेत नंतर जाहीर होणाऱ्या रोजगार डेटावर सर्वांचे लक्ष होते, जे फेडरल रिझर्व्ह पुढे काय पावले उचलेल हे दर्शवू शकते. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही आज सराफा बाजारात सोन्याचा भाव तपासू शकता. देशात आज सोन्याचे- चांदीचे भाव नेमके किती आहेत हे जाणून घेऊया.