
वॉशिंग्टन : सत्तेवर येताच निर्णयांचा धडाका लावलेल्या अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इतर देशांमध्ये दिली जाणारी आर्थिक मदत तातडीने स्थगित केली असून या मदतीचा आढावा घेण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणानुसारच हा निर्णय घेतला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.