
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात खळबळ माजवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतासह 70 देशांवर 10 ते 41 टक्क्यांपर्यंत आयात कर (टॅरिफ) लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असून, एका आठवड्यानंतर तो प्रत्यक्षात प्रभावी होईल. ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि व्यापारातील असंतुलन दूर करण्यासाठी आहे, असे व्हाइट हाउसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.