
UPI यूजर्स दिवसातून फक्त २५ वेळा बँक खाते तपासू शकतील आणि ५० बॅलन्स तपासणी मर्यादित असेल.
व्यवहारांची स्थिती दिवसातून फक्त ३ वेळा, ९० सेकंदांच्या अंतराने तपासता येईल.
NPCI ने सिस्टमवरील दबाव कमी करण्यासाठी आणि युपीआय विश्वासार्ह करण्यासाठी हे नियम लागू केले.
डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, पेटीएम किंवा फोनपे सारखे यूपीआय अॅप्स वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यूपीआयच्या नियमांमध्ये १ ऑगस्ट २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. जर तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असाल तर तुम्हाला या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने ऑनलाइन पेमेंट सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.