
नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी २०२४ च्या अखेरीस वाढीचा कल कायम राखत डिसेंबरमध्ये सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ‘यूपीआय’च्या माध्यमातून २०२४ या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात २३.२५ लाख कोटी रुपये मूल्याचे १६.७३ अब्ज व्यवहार झाले आहेत.