
US-China Trade War 2025 : अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफचा खेळ सुरुच आहे. एका देशाने टॅरिफ लादल्यानंतर, दुसरा देश देखील टॅरिफ लादतो. चीनच्या नवीन टॅरिफनंतर आता अमेरिकेनेही चीनवर एक नवीन कर म्हणजेच टॅरिफ लादला आहे. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 245% पर्यंत नवीन कर लादला आहे. मंगळवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसने हा निर्णय घेतला. चीनने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.