
USA Tariff Extension: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योगांच्या फायद्यासाठी जगभरातील सर्व देशांवर नव्या टॅरिफ धोरणाची घोषणा केली. पण या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅरिफ वाढवण्यात आलं आहे, यामुळं जगभरातील सर्वच देश संतापले आहेत. चीननं तर यावर तातडीनं प्रतिक्रिया देत, अमेरिकेवरच त्यांच्या इतकाच टॅरिफ लागू केला.
पण भारतानं यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी टीकेचे धनी देखील झाले होते. पण आता अमेरिकेनं आपल्या धोरणाची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलल्यानं भारतानं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.