Veg Thali Cost: टोमॅटोचे दर घसरल्याने व्हेज-नॉनव्हेज थाळीच्या किंमतीत घट, कांद्यामुळे वाढू शकते चिंता

Veg Thali Cost: सप्टेंबर महिन्यात एका थाळीच्या सरासरी किंमतीत 17 टक्क्यांची घट झाली आहे.
veg, non-veg thalis gets cheaper in September, onion prices rise
veg, non-veg thalis gets cheaper in September, onion prices rise Sakal

Veg Thali Cost: टोमॅटोच्या घसरलेल्या किंमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किंमती घसरल्या आहेत. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या रोटी राईस रेट (RRR) नुसार, सप्टेंबर महिन्यात एका थाळीच्या सरासरी किंमतीत 17 टक्क्यांची घट दिसून आली आहे.

मांसाहारी थाळीही झाली स्वस्त

मांसाहारी थाळीच्या किंमतीत सरासरी 9 टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात 12 टक्क्यांची वाढ झाली असून येत्या काही महिन्यांत हे दर वाढतील असा अंदाज आहे. खरीप पिकाचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात.

मिरची झाली स्वस्त

मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मिरचीचे दर 31 टक्क्यांनी कमी झाल्याने मिरचीच्या दरातही काहीसा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये मिरचीचा सरासरी भाव 30 रुपये किलो होता, ऑगस्टमध्ये मिरचीचा सरासरी भाव 44 रुपये किलो होता.

veg, non-veg thalis gets cheaper in September, onion prices rise
MGNREGA Scheme: अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा! काम शोधणाऱ्यांची संख्या वाढली

जेवणाच्या खर्चावर परिणाम करणारे इतर खर्च

सप्टेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 1,103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली असून, त्याचा परिणाम थाळींच्या किंमतीवर दिसून येत आहे. या महिन्यात हिरवी मिरचीचे भावही 31 टक्क्यांनी कमी झाले असून त्यामुळे जेवणाची थाळी स्वस्त झाली आहे.

veg, non-veg thalis gets cheaper in September, onion prices rise
RBI MPC Meeting: कर्जाचा EMI वाढला की कमी झाला? RBI गव्हर्नर यांनी घेतला मोठा निर्णय

अशा प्रकारे थाळीचे दर ठरवले जातात

देशातील सर्व राज्यांतील खाद्यपदार्थांच्या किंमतींच्या आधारे, CRISIL थाळीची सरासरी किंमत मोजली जाते. त्यामुळे लोकांच्या जेवणाचा खर्च काढणे सोपे होते. धान्य, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, बॉयलर चिकन आणि स्वयंपाकाच्या गॅसमुळे थाळीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com