
Vietjet Airline Sale: विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे विमानाची तिकिटेही महाग होत आहेत. पण विमान वाहतूक कंपन्या अशा अनेक ऑफर देतात, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही केवळ देशातच नाही तर परदेशातही स्वस्त दरात प्रवास करू शकता. दरम्यान, तुम्हीही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर व्हिएतनामच्या व्हिएतजेट एअरलाइनने भारतीयांसाठी एक उत्तम ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, भारतीय प्रवाशांसाठी वन-वे इकॉनॉमी क्लासचे भाडे केवळ 11 रुपयांपासून सुरू आहे.