

Vijay Mallya faces a dispute with SBI-led banks over outstanding loan dues and recovery claims in the Mumbai High Court
esakal
फरार व्यावसायिक विजय मल्ल्या यांनी बँकांनी त्यांच्याकडील संपूर्ण कर्ज वसूल केले असून, मूळ कर्जापेक्षाही अधिक रक्कम परत मिळवल्याचा दावा केला आहे. सुभाष चंद्र प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मल्ल्या यांनी सोशल मीडियावर हा दावा केला होता. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून मल्ल्यांच्या दाव्याला विरोध केला आहे.