
dmart news
esakal
डिमार्टमध्ये सध्या चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. सर्व सामान एका छताखाली उपलब्ध असून ग्राहक स्वतः सामान निवडू शकतो. यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे असले तरीही डिमार्टमध्ये लहान-मोठ्या वस्तू चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे डिमार्ट व्यवस्थापनाची डोकेदुखीही वाढली आहे. पण आता डिमार्टमध्ये एक माहिती फलक लावण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला थेट कायदेशीर कारवाईची माहिती मिळू शकते.