
Hybrid Mutual Funds: आजच्या अस्थिर शेअर बाजारात गुंतवणूकदारांना स्थिरता आणि वाढ यांचा समतोल साधणारा फंड हवा असतो. अशा वेळी हायब्रिड म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. मे महिन्यात हायब्रिड फंडांमध्ये तब्बल 20,765 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी एप्रिलच्या तुलनेत 46 % जास्त आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) ने दिली आहे.