
म्युच्युअल फंड युनिट्स विकण्याऐवजी त्यावर लोन घेण्याची सुविधा (LAMF) आता लोकप्रिय होत आहे.
हे कर्ज पर्सनल लोनपेक्षा कमी व्याजदरात मिळते आणि लवकर मंजूर होतं.
HDFC, SBI, ICICI यांसारख्या बँका व NBFC कंपन्या अशा प्रकारचे कर्ज देतात.
Loan Against Mutual Funds Interest Rate : आजकाल अनेक गुंतवणूकदार अचानक पैशांची गरज भासल्यानंतर म्युच्युअल फंड युनिट्स विकून टाकतात. पण ही गुंतवणूक विकण्याची वेळ आता येणार नाही. कारण, तुमच्या म्युच्युअल फंड युनिट्सच्या आधारे कर्ज घेता येतं. यालाच म्हणतात – Loan Against Mutual Funds (LAMF). हा पर्याय सध्या खूप लोकप्रिय होतोय, कारण यात तुम्हाला म्युच्युअल फंड विकावा लागत नाही, आणि कमी व्याजदरावर तुम्हाला तातडीनं पैसे मिळतात. या प्रक्रियेबद्दल समजून घेऊया.