
Sin Goods In GST
Sakal
सिन गुड्सवर आता थेट 40% जीएसटी लागू होणार असून हा नवा कर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल.
सिगारेट, पान मसाला, गुटखा, बीडी, तंबाखू उत्पादने आणि कार्बोनेटेड पेये महागणार आहेत.
सरकारचं म्हणणं आहे की हा निर्णय जनहितासाठी घेतला असून या वस्तूंचा वापर कमी करणे हाच उद्देश आहे.
Sin Goods In GST: जीएसटी परिषदेनं (GST Council) नव्या जीएसटी अंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्यास अपायकारक आणि ऐषारामी (luxury) मानल्या जाणाऱ्या वस्तूंवर आता थेट 40 टक्के जीएसटी लावला जाणार आहे. याआधी या वस्तूंवर 28% जीएसटी आणि त्यावर अतिरिक्त सेस लागू होता. नवी कररचना 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.