Union Budget 2025 PMRF Scheme Announced Esakal
Personal Finance
Union Budget 2025: पीएम रिसर्च फेलोशिप योजना म्हणजे काय? अर्थसंकल्प 2025 मध्ये केली घोषणा, जाणून घ्या PMRF मध्ये कोणाला किती मिळतात पैसे
Union Budget 2025 PMRF Scheme Announced : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२५-२६ या वर्षाचे आर्थिक बजेट सादर केला आहे. यावेळी पंतप्रधान रिसर्च फेलोशिप योजना. ही योजना भारतातील डॉक्टरेट संशोधनासाठी प्रतिभावान विद्यार्थ्यांना फेलोशिप देणारी योजना आहे
Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२५ ला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यापर्यंत विविध मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप (PMRF) योजना होय. प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप (PMRF) योजना भारतातील उच्च गुणवत्तेच्या डॉक्टरेट संशोधनासाठी आकर्षक फेलोशिप प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली होती.