
ट्रम्प टॅरिफ म्हणजे अमेरिकेने भारतासह इतर देशांच्या निर्यातीवर लावलेला जास्त आयात कर.
या टॅरिफमुळे भारताच्या शेती, औषध आणि वस्त्रोद्योग निर्यातीला फटका बसेल.
पाकिस्तानवर कमी टॅरिफ असल्याने त्याला अमेरिकेत स्पर्धात्मक फायदा होईल.
भारताच्या जीडीपीवर थोडासा परिणाम होईल, पण रोजगार क्षेत्रावर दडपण येऊ शकतं.
हा मुद्दा फक्त व्यापार नाही तर जागतिक राजकारण आणि मित्रदेशांच्या समीकरणांशी जोडलेला आहे.
भारतावर असा कोणता अमेरिकन कर लावला गेलाय की, ज्यामुळे आपल्या औषधांपासून शेती उत्पादनांपर्यंत सगळं महाग होऊ शकतं… आणि त्याच वेळी पाकिस्तानला विशेष सवलत का? ट्रम्प टॅरिफमागचं खरं राजकारण काय आहे, आणि यात भारताचं नुकसान किती होणार? यामुळे सामान्य लोकांना फटका बसणार का? ह्या सर्व किचकट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या शब्दात समजून घेऊया...