Wheat Price Hike in India
ESAKAL
गव्हाच्या दरात गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. देशातील काही बाजार समित्यांमध्ये महिनाभरात गव्हाचे भाव क्विंटलमागे सुमारे २०० रुपयांनी वाढले असून, काही ठिकाणी दर २,८५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गव्हाच्या पिठाचे दरही ३४ ते ३५ रुपये किलोच्या आसपास आहेत. विशेष म्हणजे यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन झाले असतानाही दर वाढत आहेत असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.