
म्युच्युअल फंड खरेदी करणे आणि योग्य वेळी विकणे महत्त्वाचे आहे.
भीतीपोटी किंवा चुकीच्या कारणाने विकल्यास नुकसान होऊ शकतं.
सलग खराब परफॉर्मन्स किंवा जीवनातील मोठ्या बदलांमध्ये विक्री करणे योग्य ठरते.
Why Selling Mutual Funds Matters: आज अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. पण योग्य वेळी फंड विकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय गुंतवणूकदार फंड खरेदीवर जास्त भर देतात. कोणता फंड चांगला आहे, कोणता फंड मॅनेजर उत्तम रिटर्न देतोय, किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये पैसा टाकावा याचा जास्त विचार करतात. मात्र विक्रीबाबत चर्चा कमीच होते. खरेदी करणे सोपे वाटते, पण विक्रीचा निर्णय मोठा असल्यासारखा वाटतो.