
RBI Repo Rate: अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जवळपास पाच वर्षांत प्रथमच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कर्जाचा व्याजदर कधी कमी होईल हे तुमच्या कर्जाच्या प्रकारावर अवलंबून आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रेपो रेटशी निगडीत कर्ज घेणाऱ्यांच्या व्याजदरात लवकरच कपात होईल, तर MCLR शी संबंधित कर्ज घेणाऱ्यांना व्याजदर कमी होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.