
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर गीता गोपीनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून परतणार आहेत.
IMF मध्ये सात वर्षे काम केल्यानंतर त्या 1 सप्टेंबरपासून हार्वर्डमध्ये प्राध्यापक (Economics) पदाचा कार्यभार स्वीकारतील.
IMF च्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Who Is Gita Gopinath: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर गीता गोपीनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुमारे सात वर्षांच्या सेवेनंतर त्या पुन्हा आपल्या शैक्षणिक कारकिर्दीकडे वळत आहेत. गीता गोपीनाथ यांनी सोशल मीडियावर (X) पोस्ट करत ही माहिती दिली. त्या ऑगस्टमध्ये आपल्या पदाचा कार्यभार सोडतील आणि 1 सप्टेंबरपासून हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम सुरू करतील.