
DeepSeek Founder Net Worth: चायनीज AI स्टार्टअप DeepSeek अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. DeepSeekने अवघ्या 24 तासांत जगातील एआय इंडस्ट्रीला हादरवून सोडले आहे. यामुळे जगातील आघाडीची चिप निर्माता अमेरिकन कंपनी एनव्हीडियाला एका झटक्यात सुमारे 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम भारतीय एआय कंपन्यांवरही दिसून आला.