Income Tax: लहान मुलांच्या नावाने आयकर विभाग पाठवतंय नोटीस, काय आहे कारण? जाणून घ्या

आयकर विभागाने अनेक मुलांच्या नावाने नोटिसा बजावल्याने अनेक पालक चिंतेत आहेत.
Income Tax
Income Taxsakal

Income Tax: इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर) भरताना प्रत्येक स्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल सांगणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण काही माहिती लपवतात. आता असे करणाऱ्या करदात्यांना आयकर विभागाच्या कारवाईतून वाचणे अशक्य आहे.

आयकर विभागाने आपली यंत्रणा यासाठी तयार ठेवली आहे. कर भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही कर भरला नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाते.

सध्या आयकर विभागाने अनेक मुलांच्या नावाने नोटिसा बजावल्याने अनेक पालक चिंतेत आहेत. कर तज्ज्ञ शरद कोहली यांनी सीएनबीसीला याबाबत माहिती दिली.

काय आहे कारण?

ते म्हणाले की, करदात्यांच्या यादीत मुलांचा समावेश नसला तरी मुलाच्या बँक खात्यातून मोठ्या रकमेचा व्यवहार झाला की, आयकर विभाग मुलाच्या नावाने नोटीस जारी करतो.

मुलाच्या खात्यातून 2.5 लाख डॉलर देशाबाहेर पाठवले गेल्यावर ही नोटीस जारी केली जाते. यामुळे, हे खाते आयकर ट्रॅकिंग सिस्टममध्ये समाविष्ट केले जाते.

एका वर्षात किती पैसे पाठवले जाऊ शकतात?

लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत, तुम्ही एका वर्षात 2.5 लाख डॉलर्स देशाबाहेर पाठवू शकता.

पालक त्यांच्या मुलांच्या खात्यातून पैसे का पाठवतात?

मुलांचे कोणतेही निश्चित उत्पन्न नसते, जेव्हा त्यांच्या खात्यातून 2.5 लाख डॉलर्स हस्तांतरित केले जातात तेव्हा ते पालकांचे पैसे असणे बंधनकारक आहे.

पालक कर वजावटीसाठी हे व्यवहार करतात. या नोटिसा फक्त पालकांनाच पाठवल्या जातात, पण बँक खाते मुलाच्या नावावर असल्याने नोटीसवर मुलाचे नाव दिसते.

Income Tax
Adani Total Gas: अदानी टोटल गॅसने CNG-PNG च्या दरात केली मोठी कपात, मध्यरात्री 12 पासून नवीन दर लागू

नोटीसला कसे उत्तर द्यावे?

कर तज्ञांनी सांगितले की पाठवलेल्या पैशावर पालकांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. यासोबतच उत्पन्नाचा स्रोत आणि पैसे पाठवण्याचे कारणही नमूद करावे लागेल.

तुम्ही हा व्यवहार आयकर परतावा (ITR) च्या शेड्यूल ऑफ फॉरेन एसेंटमध्ये दाखवला नाही, तर तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड देखील होऊ शकतो. ब्लॅक मनी (Black Money Law) कायद्यानुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Income Tax
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com