
10 ग्रॅम सोन्याचा भाव साठी 1,06,200 रुपयांवर पोहोचला; हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे.
चांदी 1,26,100 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
अमेरिकन फेड रिझर्व्हची धोरणं, रुपयातील घसरण आणि आंतरराष्ट्रीय मागणीमुळे ही तेजी आली आहे.
Gold Rate Today 2 September 2025: आज सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 1,06,200 रुपयांवर पोहोचला असून 22 कॅरेट सोनं 97400 रुपयांवर व्यवहार करत आहे. काल सायंकाळी सोनं विक्रमी पातळीवर बंद झालं होतं आणि हीच तेजी आजही सुरू आहे.
चांदी देखील गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. आज चांदीचा भाव 1,26,100 रुपये प्रति किलो झाला असून कालच्या तुलनेत त्यात 100 रुपयांची वाढ झाली आहे.