
Why Stock Market Falls: आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 568.40 अंकांनी किंवा 0.69 टक्क्यांनी घसरून 80,762.16 वर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 172.45 अंकांनी घसरला आणि 24,500च्या खाली पोहोचला.
यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजारात मोठी विक्री दिसून आली. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.