
Share Market Fall: आज 22 मे रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारपेठेत विक्री आणि अमेरिकेतील वाढत्या वित्तीय तूटीच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 1,000 हून अधिक अंकांनी घसरून 80,727.11 या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, निफ्टी 271हून अधिक अंकांनी घसरून 24,541.60 वर पोहोचला.