
पीएम किसान योजनेतून आतापर्यंत 20 हप्त्यांत 3.9 लाख कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
2 ऑगस्ट रोजीचा 20वा हप्ता 9.7 कोटी शेतकऱ्यांना मिळाला, प्रत्येकी 2,000 रुपये दिले गेले.
सरकारने स्पष्ट केले आहे की 21व्या हप्त्यात रक्कम वाढवली जाणार नाही, ती पूर्वीप्रमाणेच 2,000 रुपये राहील.
PM Kisan 21st Installment Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार आहे. 2019 च्या फेब्रुवारीत सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 20 हप्त्यांद्वारे 3.9 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.