
Infosys Wipro Jobs 2025: देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे. Infosys आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, तर विप्रोने 10,000 ते 12,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. शुक्रवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना विप्रोने ही माहिती दिली. आयटी क्षेत्रांत मागणी वाढत असल्याचे हे संकेत आहेत.