Nirmala Sitharaman: वृद्ध महिलेचा व्हिडिओ शेअर करून अर्थमंत्र्यांनी SBIला फटकारले, जाणून घ्या कारण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलेच्या दुरवस्थेबद्दल स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर ताशेरे ओढले आहेत.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal

Nirmala Sitharaman: एका 70 वर्षीय महिलेला पेन्शन मिळवण्यासाठी खुर्चीवर अनेक किलोमीटर अनवाणी पायी चालावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला कडक उन्हात तुटलेल्या खुर्चीवर चालत जाताना दिसत आहे.

आता, व्हिडिओ शेअर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलेच्या दुरवस्थेबद्दल स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर ताशेरे ओढले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वृद्ध महिलेचे नाव सूर्या हरिजन असे आहे. हरिजन यांचा मोठा मुलगा दुसऱ्या राज्यात मजूर आहे.

ती तिच्या धाकट्या मुलासोबत राहते जो गुरे चारण्याचे काम करतो. कुटुंबाकडे कोणतीही जमीन नसून ते झोपडीत राहतात.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या व्यवस्थापकाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे, परंतु तरीही वित्तीय सेवा विभाग (DFS) आणि SBI यांना तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी आशा आहे.''

''त्या भागात बँक मित्र नाहीत का?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ही घटना 17 एप्रिलची ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील आहे.

SBI Bank Tweet
SBI Bank TweetSakal

अर्थमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर एसबीआयची भूमिका कायम :

या प्रकरणावर अर्थमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर, SBI ने ट्विट केले की, "व्हिडिओ पाहून आम्हालाही खूप दु:ख झाले आहे. श्रीमती सूर्या हरिजन दर महिन्याला त्यांच्या गावात CSP मधून पेन्शन काढत होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नव्हते.

त्यानंतर आम्ही घरोघरी पेन्शन वितरणाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना लवकरच व्हीलचेअर सुपूर्द करू."

त्या नातेवाईकासोबत आमच्या झारीगाव शाखेत गेल्या होत्या. आमच्या शाखा व्यवस्थापकाने ताबडतोब त्यांच्या खात्यातून पैसे काढून दिले. आमच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले आहे की पुढील महिन्यापासून त्यांची पेन्शन त्यांच्या घरी पोहोचवली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com