

Women’s Day 2026: Why Term Insurance and Retirement Planning Are Crucial for Women’s Financial Independence
eSakal
लेखक - रुषभ गांधी, सदस्य, इन्शुरन्स अवेअरनेस कमिटी (IAC-Life) आणि पराज राजा, सदस्य, इन्शुरन्स अवेअरनेस कमिटी (IAC-Life)
Financial Planning For Women: भारतामधील नोकरदार महिलांची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. 2017-18 मध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचीएकूण लोकसंख्या 23.3 टक्के होती ती 2023-24 मध्ये 41.7 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. अधिकाधिक महिला रोजगाराच्या क्षेत्रात प्रवेश करत असल्याने देशातील आर्थिक समावेशकतेमध्ये महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहे. कुटुंबाचे आर्थिक नियोजन हे एकेकाळी प्रामुख्याने पुरुषांची जबाबदारी असे. मात्र बदलत्या काळात आता महिलांचा यात सक्रिय आणि सजग सहभाग वाढताना दिसतो. निरीक्षकांच्या मते, घरगुती आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत असून विमा उत्पादने खरेदी करण्याच्या निर्णयातही त्या अधिक सक्रिय होत आहेत.