
थोडक्यात:
जूनमध्ये किरकोळ महागाई 2.1% आणि घाऊक महागाई 0.13% वर आली असून ही गेल्या अनेक वर्षांतील नीचांकी पातळी आहे.
महागाई कमी होण्यामागे चांगला पाऊस, अन्नधान्याचे घसलेले दर ही कारणे आहेत.
महागाई कमी झाल्यामुळे RBI ऑगस्टमध्ये रेपो दरात कपात करू शकते आणि त्यामुळे EMI कमी होण्याची शक्यता आहे.
RBI Repo Rate: देशात महागाईदरात मोठी घसरण झाली आहे. जून महिन्यात किरकोळ महागाई (CPI) 2.1 टक्क्यांवर आली असून ही गेल्या 6 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळी आहे. दुसरीकडे घाऊक महागाई (WPI) देखील 0.13 टक्क्यांवर आली आहे. ही घसरण अंदाजापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे आरबीआयकडे (RBI) आता व्याजदर कपात करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे.