
Zomato Swiggy Breached Competition Laws: Zomato आणि Swiggy हे भारतातील दोन सर्वात मोठे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत. आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) त्यांच्या तपासणीत झोमॅटो आणि स्विगीने काही रेस्टॉरंटना फायदा मिळवून देण्यासाठी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. CCI ने मार्च 2024 मध्ये Zomato, Swiggy आणि तक्रारदार रेस्टॉरंट ग्रुपला आपला अहवाल सादर केला होता.