

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सब्सक्राइबर्ससाठी नवीन सुविधा आणली आहे. ‘पासबुक लाईट’ या नव्या फीचरच्या मदतीने आता कर्मचाऱ्यांना केवळ एका क्लिकमध्ये त्यांच्या पीएफ पासबुकची संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. त्यामुळे पीएफ बॅलन्स तपासणे यापूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे.