

Stock Market Portfolio Losses Why Your Investments May Fall More Than the Benchmark Index During Market Volatility in India
sakal
-किरांग गांधी,अनुभवी आर्थिक मेंटॉर
शेअर बाजार किती घसरेल, यावर आपले नियंत्रण नसते; पण आपले पैसे इतरांपेक्षा जास्त का बुडाले, हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. समजा, ‘निफ्टी’ १० टक्क्यांनी खाली आला आणि तुमचा पोर्टफोलिओ मात्र, सरळ २० टक्क्यांनी कोसळला, तर त्यामागची कारणे शोधणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला डोळसपणे आणि प्रामाणिकपणे काही गोष्टी तपासाव्या लागतील.