
प्राची गावस्कर
प्रश्न: महिलांच्या दृष्टीने आर्थिक सक्षमतेचे काय महत्त्व आहे? महिलांनी स्वतःसाठी आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत काय सांगाल?
उत्तर: महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलंच पाहिजे, या मताची मी आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, तर घरातही तुम्हाला आदर मिळतो, समाजामध्येही तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकता. त्यामुळं कमी का असेना; पण थोडेसे तरी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक महिलेनं केला पाहिजे. त्याचबरोबर स्वतःसाठी गुंतवणूक करण्यावरही भर दिला पाहिजे.