

What is Probate and Why is it Important
sakal
ॲड. रोहित एरंडे (कायद्याचे जाणकार)
स्मार्ट माहिती
‘प्रोबेट’ म्हणजे काय हे बघण्याआधी इच्छापत्राची माहिती घेणे गरजेचे आहे. इच्छापत्र इतर दस्तांच्या तुलनेने करावयास सोपा असा दस्तऐवज आहे. कीर्तीचे माहिती नाही, ‘मरावे परी इच्छापत्ररूपी उरावे’ एवढे मात्र, आपल्या हातात आहे. इच्छापत्राबद्दलच्या तरतुदी भारतीय वारसा कायदा १९२५ मध्ये समाविष्ट केल्या आहेत. कोणतीही सज्ञान आणि जिचे मानसिक संतुलन ढळलेले नाही, अशी व्यक्ती तिच्या स्व-कष्टार्जित (self-acquired), स्थावर आणि जंगम मिळकतींसंदर्भात इच्छापत्र करू शकते.