Premium|Retirement Financial Planning : एआयच्या युगात नोकरीची खात्री नाही, मग निवृत्तीची तयारी कशी करणार?

Pension Plans India : वाढती महागाई आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निवृत्तीनंतरचा आर्थिक प्रश्न गंभीर होत आहे. वेळीच योग्य नियोजन न केल्यास उत्पन्नाअभावी सवयी आणि छंद यांना मुरड घालावी लागेल. शांतपणे वाढणाऱ्या महागाईचा विचार करून आजच गुंतवणूक करणे काळाची गरज आहे.
Retirement Financial Planning

Retirement Financial Planning

esakal

Updated on

दीपाली किणीकर - kinikardeepali@gmail.com

आ जच्या वेगवान आणि ‘एआय’च्या बदलत्या युगात प्रत्येक जण अधिक चांगली कमाई करण्याचा, कुटुंबाला सर्व सुविधा देण्याचा आणि आरामदायी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आधुनिक सोयीसुविधा, डिजिटल साधने, चांगले शिक्षण आणि आरोग्यसेवा यामुळे आपल्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. परंतु, निवृत्तीनंतरही आपण हीच जीवनशैली टिकवू शकू का? हा प्रश्‍न नेहमीच सतावतो.

याचे उत्तर आहे योग्य निवृत्ती नियोजनात...

ज अनेक जण कमाई करत असताना उत्तम जीवन जगतात. परंतु, निवृत्तीचा आर्थिक विचार मात्र पुढे ढकलतात. परिणामी, आपण निवृत्त होण्यापूर्वीच आपली जीवनशैली ‘रिटायर’ होण्याची वेळ येऊ शकते. म्हणजेच, उत्पन्न कमी झाल्यानंतर खर्च भागवणे कठीण होते आणि आपल्या सवयी, छंद आणि अपेक्षा पर्यायाने कमी कराव्या लागतात.

बदलती जीवनशैली, वाढते खर्च

आजच्या काळात जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. पूर्वीच्या काळात साधे जीवन आणि मर्यादित खर्च ही सामान्य गोष्ट होती. मात्र, आज शिक्षण, आरोग्य, घर, प्रवास आणि मनोरंजन यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. राहणीमान सुधारले असले, तरी त्यासाठी लागणारा खर्चही वाढला आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही ही जीवनशैली टिकवण्यासाठी आर्थिक तयारी असणे अत्यावश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com