
Avoid Paying LTCG Tax: Real Estate Strategies Every Investor Should Know
भांडवली लाभ (कॅपिटल गेन) हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. सरकार गुंतवणूकदारांवर अनेक प्रकारचे कर लावत असते. भांडवली लाभावरील कर हादेखील त्याचाच एक भाग आहे. हा एक असा कर आहे, जो चल आणि अचल संपत्तीच्या विक्रीवर झालेल्या नफ्यावर लावला जातो. कारण सरकार हा नफा उत्पन्नाचा एक भाग मानते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, एखादी मालमत्ता उदा. जमीन, घर, सोने, शेअर, बाँड, बँक एफडी आदींपैकी कशाचीही विक्री करता, तेव्हा तुम्हाला त्यावर नफा मिळतो. म्हणजेच तुम्हाला विकल्यावर मिळणारी रक्कम ही खरेदीच्या रकमेपेक्षा जास्त असते. या नफ्याला भांडवली लाभ म्हणतात आणि त्या भांडवली लाभावर जो कर भरावा लागतो, त्याला भांडवली लाभ कर म्हणतात.