
PSU Index Explained: Should You Invest in Government Companies?
प्रमोद पुराणिक
pramodpuranik5@gmail.com
सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी मालकीच्या (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग- पीएसयू) कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर, त्यांचा समावेश असलेला निर्देशांक म्हणजे पीएसयू इंडेक्स. भारतीय शेअर बाजारात या निर्देशांकामध्ये आता ६३ कंपन्यांचा समावेश आहे. या निर्देशांकामुळे सरकारी कंपन्यांचा मागोवा घेणे शक्य झाले आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना या निर्देशांकाची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.