
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर इच्छापत्र समोर आलंय. रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा वाटा दान केलाय. त्यांची एकूण संपत्ती ३८०० कोटी रुपये इतकी आहे. यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे. बहुतांश संपत्ती रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला दान केला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलंय.