शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

विश्लेषक भूषण ओक यांचे मार्गदर्शन; कंपनीची उत्तम व्यवसायवाढ आणि मूल्यांकनाचे विश्लेषण
Guidance by analyst Bhushan Oak; Analysis of company's strong business growth and valuation

Guidance by analyst Bhushan Oak; Analysis of company's strong business growth and valuation

Sakal

Updated on: 

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लि. ही २००४ मध्ये स्थापित आणि २०२१ मध्ये शेअर बाजारात नोंदणीकृत झालेली पर्यटन क्षेत्रातील एक सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी आहे. विमान कंपन्या, हॉटेल साखळ्या, कार रेंटल कंपन्या, ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्या, क्रूझ कंपन्या, डेस्टिनेशन मार्केटिंग कंपन्या, ट्रॅव्हल मॅनेजमेंट कंपन्या पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांना ही कंपनी ‘एआय’ संचालित ‘सास’ (एसएएएस- सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस) आणि डेटा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. यामुळे या कंपन्यांना ग्राहक मिळवणे, इष्ट किमती ठरवणे, ग्राहक धरून ठेवणे आणि व्यवसायवृद्धी यासाठी मदत होते. कंपनीचे १६० देशांमध्ये तेरा हजारांहून अधिक ग्राहक आहेत. यात सर्वांत मोठ्या ४० हॉटेल साखळ्यांपैकी ३३, सर्वांत मोठ्या चार विमान कंपन्या, सात कार रेंटल कंपन्या आणि २५ ‘फॉर्च्यून ५००’ ग्राहकांचा समावेश आहे. कंपनीने २०१८ नंतर तीन कंपन्या अधिग्रहित करून या व्यवसायाच्या इतर क्षेत्रातील क्षमताही वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com