

RBI's Action Against Soaring Bank Fraud
Sakal
अशोक जोशी - निवृत्त बँक अधिकारी
रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आर्थिक वर्ष २०२४-२५च्या वार्षिक अहवालानुसार, बँक फसवणुकीचे एकूण मूल्य ३६,०१४ कोटींवर पोहोचले आहे, जे मागील वर्षापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. फसवणुकीच्या सर्व प्रकरणांत ५६ टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणे डिजिटल पेमेंटमधील फसवणुकीची आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने एक नोव्हेंबर २०२५पासून रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली असलेल्या सर्व बँकांना त्यांच्या सध्याच्या डोमेनवरून ‘.bank.in’ या डोमेनवर स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार सर्व बँकांनी आपल्या डोमेनमध्ये एक नोव्हेंबरपासून बदल केले आहेत.