

Weekly CIBIL Score Reporting
sakal
शशांक वाघ - निवृत्त बँक अधिकारी
‘सिबिल’सारख्या पतमाहिती (सीआयसी) संस्था प्रत्येक कर्जदाराचा संपूर्ण तपशील व परतफेडीचा सात वर्षांचा लेखाजोखा ठेवतात आणि मिळालेल्या माहितीनुसार कर्जदाराचे प्रगतिपुस्तक तयार करून गुण म्हणजेच सिबिल स्कोअर देतात, हे सर्वांनाच माहीत आहे. पूर्वी दर महिन्याला कर्जदाराची परीक्षा घेतली जायची, आता एक एप्रिल २०२६ पासून ती दर आठवड्याला घेतली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने आणलेल्या नव्या नियामक निकषांमध्ये अनुत्पादित कर्जासाठी (एनपीए) ९० दिवसांच्या मर्यादेत मात्र, कोणताही बदल केलेला नाही. कर्जदारांनी आता कर्ज परतफेडीबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे.