Reserve bank of india: मार्च ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये आरबीआयने परदेशात ठेवलेला आपला तब्बल ६४ टन सोन्याचा साठा भारतात माघारी मागवला आहे. देशाची आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. जगभरात भू-राजकीय तणाव निर्माण झालेला असताना रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतलेला आहे. अनेक देश आता आर्थिक शस्त्रे म्हणून मालमत्ता गोठवणे आणि बंदी घालणे, असे प्रकार करीत आहेत. त्यामुळे अशा अस्थिर वातावरणात आपला सोन्याचा साठा देशातील तिजोरीत ठेवणे अधिक सुरक्षित आणि धोरणात्मक निर्णय मानला जातोय.