

repo rate
Sakal
Monetory Policy Committee : भारतीय रिजर्व बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने 3 दिवसांच्या बैठकीनंतर एकमताने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच धोरणात्मक भूमिका म्हणजेच पुढच्या दराविषयीची भूमिका ‘Neutral’ (तटस्थ) म्हणून कायम ठेवली आहे. त्यामुळे पुढच्या रेपो दरात कपात होऊ शकते, दर वाढविले जाऊ शकतात किंवा आहे तोच दर कायम ठेवला जाऊ शकतो अशा तिन्ही शक्यता आहे.