Relief for Small Taxpayers
sakal
प्राप्तिकर विभागाने पाच जुलै २०२४ नंतर मूल्यांकन प्रक्रिया (स्किमा) बदलली आणि या बदलाची कोणतीही पूर्वसूचना देण्यात न आल्याने छोट्या करदात्यांना फटका बसला. प्राप्तिकरासाठी विशेष दर उत्पन्न असणाऱ्या, परंतु सात लाख रुपयांपेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेल्या (जुनी करप्रणाली रु. ५ लाख) छोट्या करदात्यांना कलम ८७ ए अंतर्गत मिळणारी अल्प व दीर्घकालीन भांडवली नफ्यावरची करसवलत नाकारण्यात आली.