
रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) ने असा निर्णय दिला आहे, ज्यामुळे घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. सहसा घर किंवा फ्लॅट बुक करताना काही पैसे बिल्डरला बुकिंग रकमे म्हणून द्यावे लागतात. रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, २०१६ नुसार, बुकिंगची रक्कम घराच्या किमतीच्या १०% पेक्षा जास्त नसावी. बऱ्याचदा लोक बुकिंग करतात. परंतु नंतर काही कारणास्तव बुकिंग रद्द करावे लागते. अशा परिस्थितीत बिल्डर बुकिंगची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करतो.